बाळासाहेब यांच्यावर आधारित चित्रपटात. पहा तरी कसा दिसतो नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत..

1
632
बाळासाहेब-thackeray-movie-nawazuddin-siddiqui

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बेतलेल्या ‘ठाकरे’ या सिनेमाचा आज मोठ्या थाटामाटात टीझर लाँच करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे.

सिनेमात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. नवाझुद्दीनच्या आधी या व्यक्तीरेखेसाठी अक्षय कुमार आणि इरफान खान यांच्या नावाचीही चर्चा होती. ‘ठाकरे’ असं या बायोपिकचं नाव आहे.

ज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.

कसलेला अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारणा-या नवाजुद्दीनसाठी ही भूमिकाही तितकीच आव्हानात्मक असणार आहे यात काही वाद नाही.

हा एक चरित्रपट असणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.

संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांनी मी जास्त ओळखतो. ज्यांच्या आयुष्यात असं बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवलं जाऊ शकतं. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा चित्रपट लोकप्रिय व्हावा,” असं मला वाटतं. नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याने आधीच उत्सुकता वाढली आहे.

यापूर्वी मराठीत संजय राऊत यांनी ‘बाळकडू’ हा मराठी चित्रपट बनविला होता. मात्र, त्यात मराठी तरूणाला बाळासाहेबांपासून प्रेरणा कशी मिळते व त्याच्या चेतना जाग्या कशा होतात हे दाखविण्यात आले होते.

बाळासाहेब-thackeray-movie-nawazuddin-siddiqui

बाळकडू हा चित्रपट बायोपिक गटात मोडणारा नव्हता. तसंच चित्रपटात फक्त बाळासाहेब यांचा आवाज वापरण्यात आला होता.

पण यावेळी हिंदी चित्रपटात नवाजुद्दीन त्यांची भूमिका साकारणार असल्याने प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

1 COMMENT

  1. […] मीडिया, पत्रकार, नेते, विरोधक बाळासाहेबांना एकाच प्रश्न विचारात होते, “हे तुमचे […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here