फ्लिपकार्ट चे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

0
122
फ्लिपकार्ट चे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा | binny bansal quits flipkart

फ्लिपकार्ट या बड्या ई कॉमर्स कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ बिन्नी बन्सल यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टचे अधिग्रहण केल्यानंतर सहा महिन्याच्या आत बन्सल यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बन्सल यांनी राजीनाम दिल्यानंतर कंपनीच्या बोर्ड मध्ये ते राहणार की नाही हे अजून निश्चित झालेले नाही.

बन्सल यांनी खाजगीत आर्थिक गैरव्यवहार केल्याने फ्लिपकार्ट आण वॉलमार्ट यांनी चौकशी करून हा निर्णय घेतला आहे. तर बन्सल यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहे. चौकशीदरम्यान बन्सल यांनी केलेल्या व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव आढळल्याने बन्सल यांच्या राजीनाम्याचा स्विकार केल्याचे वॉलमार्टने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here