चिल्लरचे वांदे ! बारा लाखांच्या चिल्लरवर झोपतात पेट्रोलपंपाचे मालक

0
147
चिल्लरचे वांदे ! बारा लाखांच्या चिल्लरवर झोपतात पेट्रोलपंपाचे मालक | petrol pump owner sleep on coins

बुलढाणा: बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील हिरोळे पेट्रोलपंपाचे मालक अमोल हिरोळे हे चक्क 12 लाखाच्या चिल्लर पैशांवर झोपतात. कारण बँक चिल्लर घेत नाही व ग्राहक पेट्रोल पंपावर चिल्लर देतात. त्यामुळे या चिल्लरचे करायचे काय? हा प्रश्न त्यांना पडला असून त्यांच्याकडे साचून साचून ही चिल्लर 12लाख रुपयाची झाली आहे. शेवटी ‘नोट करे गोट, चिल्लर करे विचार’ असे म्हणण्याची वेळ हिरोळेवर आली आहे.

आज बुलढाणा येथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने एरियाचे सेल्स ऑफीसर विनायक चावरे यांनी नवीन पेट्रोल पंप वाटपाबाबत पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेच्या वेळी बुलढाण्यातील एक प्रतिष्ठित व्यापारी शहरातील इंडियन ऑईल या पेट्रोलपंपाचे मालक अमोल हिरोळे हे उपस्थित होते. त्यांनी या व्यवसायात येणार्‍या अडचणींबाबत मनमोकळी चर्चा केली. अमोल हिरोळे म्हणाले, आज सगळ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असून अनेक अफवा, फेक मेसेजमुळे ग्राहक गोंधळून जातात व अनेक ग्राहक या फेक मॅसेजवर विश्वास ठेवून वागतात. शंभर रुपयांचे पेट्रोल भरले तर पेट्रोल कमी येते. त्यामुळे पुर्ण रकमेचे पेट्रोल न भरता 91, 92, 102, 105 अशा विषम संख्येत भरतात.

अमोल हिरोळे यांचा पेट्रोल पंपावर पेट्रोल -डिझेलची विक्री जिल्ह्यात नंबर एकची आहे. त्यामुळे दररोज एक, दोन, पाच, दहा रुपयांची चिल्लर रक्कम हजारोंच्या घरात जमा होतात. ही रक्कम बँक सुद्धा घेत नाही. त्यामुळे साचून साचून ही रक्कम बारा लाख झाली.

हिरोळे यांनी ही रक्कम झोपण्याच्या दिवानमध्ये टाकून त्याच्यावरच ते झोपतात. उत्कृष्ट ग्राहक म्हणून दरवर्षी एसबीआय त्यांचा सत्कार करते. परंतु चिल्लर घेण्यास नकार देते. याबाबत त्यांनी बँक अधिकार्‍याला वारंवार बोलल्यानंतर ते दररोज दोन हजारांची चिल्लर घेवू असे सांगितले आहे.

परंतु तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त चिल्लर दररोज जमा होत असल्यामुळे या चिल्लरचे करायचे काय असा प्रश्न पडला असून चिल्लरचे झाले वांदे असे म्हणण्याचे वेळ हिरोळे यांचेवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here