दोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.

0
272

“हम भी वही है जो किसीके पिछे खडे नाही होते, जहा खडे हो जाते है लाईन वहासे शुरू होती है….” 1981च्या कालिया चित्रपटातील शेहनशाहचा कडक डायलॉग..

हाच शेहनशाह करीयरच्या सुरुवातीच्या अपयशी काळात मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील बाकावर रात्र गुजारत होता अन तुटपुंज्या 300 रुपये पगारावर मायानगरीत स्ट्रगल करत होता हे कदाचित अनेकांना माहित नसेल. आनंद चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशीसुद्धा लोकांनी ज्याला ओळखले नाही त्या मेगास्टारचे नुसते लांबून “संडे दर्शन” घ्यायला आज हजारो लोक दर रविवारी जलसा या त्याच्या निवासस्थानी तुटून पडतात.. अशा या “बिग बी” च्या काही गोष्टी शेअर करतोय. अमिताभच्या डायहार्ड फॅन्सना कदाचित या माहितही असतील वा कदाचित नसतीलही..

1. अॅम्बीडेक्स्टस अमिताभ :
1969 साली एक डबिंग कलाकार म्हणून मृणाल सेनच्या “भुवन शोम” चित्रपटाला आवाज देत चित्रपटसृष्टीत एन्ट्री करणाऱ्या या अद्वितीय अवलियाने नंतर अॅक्टींगच नव्हे तर सिंगिंगमध्येही आपले कौशल्य दाखवले. बिग बी लेफ्टी आहे हे सर्वांना माहित आहेच. परंतु ह्या अनेक गुणांनी पुरेपूर असणाऱ्या कलाकाराकडे आणखी एक कला आहे ती म्हणजे दोन्ही हाताने लिहू शकणे. जगात फार थोड्या लोकांकडे ही कला आहे अन त्यातील बच्चनसाहेब एक. इंग्रजीमध्ये याला Ambidextrous या नावाने ओळखले जाते.

 

2. मादाम तुसेमधील पहिला आशियायी :
जगभरात अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे अन त्यांच्या कालागुणांचे चाहते आहेत. प्रसिध्द फ्रेंच दिग्दर्शक फ़्रान्कोइज ट्राफट यांनी तर “बिग बी” हे वन मॅन इंडस्ट्री आहेत असे म्हटले आहे. बॉलीवूडच्या या अंग्री यंग मॅनची दखल बीबीसीने देखील घेतली आहे. अन हो इंग्लंड मधील मादाम तुसेच्या मेणाच्या संग्रहालयात पहिला आशियायी नायक म्हणून दाखल व्हायचा मानदेखील सिनियर बच्चन यांनाच..

3. अवार्ड्सची बरसात :

आज अखेर सुमारे 200 चित्रपटात काम केलेला हा नायक आपल्या सामाजिक जीवनात देखील तितक्याच तन्मयतेने कार्य करतो. गरजू लोकांना मदत असो वा प्राण्यांच्या हिताचे काम असो बच्चन साहेब हजर. अश्या या रील मधील अन रीयल मधील नायकावर अवार्ड्सचा पाऊस पडणे साहजिकच. नुकताच अमेरिकन अॅम्बसीने सामाजिक कार्यासाठी अवार्ड दिला. दोस्तहो ही फक्त एक झलक.

3 नॅशनल, 14 फिल्मफेअर अवार्ड, 1991 चा पहिला फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड, 2000 चा सुपरस्टार ऑफ दी मिलेनियम, आशियन फिल्म अवार्ड, 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण, 2015 मध्ये पद्म विभूषण असे भारतीय अवार्ड्स.

बीबीसी चा 99 चा ग्रेटेस्ट स्टार ऑफ स्टेज ऑर स्क्रीन, 2001 मध्ये इजिप्त मधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मधील अॅक्टर ऑफ सेन्चुरी, फ्रांस सरकारचा 2007 चा सर्वोच्च सिव्हीलीयन “नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर”, युनिसेफचा गुडविल अॅम्बसीडर…

सात जागतिक विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदव्या, 2012 च्या ऑलम्पिक स्पर्धेची मशाल हाती मिळण्याचा मान, इतकेच नव्हे अलाहबादमध्ये त्यांच्या नावाचा रस्ता अन कलकत्त्यामध्ये अमिताभ देवाचे मंदीर…अबब..

दिवार मध्ये ते म्हणतात “आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है..” स्मार्टला आदराने असेही म्हणावे वाटते “सर आपके पास ढेरसारे अवार्ड्सभी है”

4. हॉलीवूडमध्ये अवतार :
बॉलीवूडचा हा राजाने त्याच्या कामाची व्याप्ती फार वाढवली आहे की दिवसोंदिवस ते कामच करत असतात. चित्रपट, टीव्ही, इतर शोसाठी डबिंग, जाहिराती, स्वतचा बिझीनेस इत्यादी इत्यादी.. अन वर करोडो चाहत्यांच्या अपेक्षा.. त्यांच्या या व्यस्त धावपळीत मध्येच त्याना हॉलीवूड चित्रपटात काम करायची ऑफर होती. “दी ग्रेट गॅट्सबे या हॉलीवूड चित्रपटात त्यांनी कामही केले. त्यांच्या बरोबर लिओनार्डो डीकॅप्रियोने काम केले.

 

5. पुरा नाम, विजय दिनानाथ चौहान :

11 ऑक्टोबर 1942 ला जन्म झालेल्या अमिताभ यांचे मूळ नाव पालकांनी “इन्कलाब” असे ठेवले होते. स्वातंत्र संग्रामातील “इन्कलाब जिंदाबाद” या घोषावरून हे नाव ठेवले गेले होते. नंतर वडील हरीवंशराय बच्चन यांनी त्यांचे नाव बदलून “अमिताभ” असे ठेवलं ज्याचा अर्थ “ज्योत जी कधीच विझत नाही”. विशेष म्हणजे हरीवंशराय यांचे आडनावही बच्चन नव्हते तर ते त्यांचे टोपण आडनाव होते. त्यांचे खरे आडनाव श्रीवास्तव असे होते. म्हणजे इन्कलाब श्रीवास्तव हे नंतर अमिताभ बच्चन झाले. गम्मत म्हणजे या नायकाने बॉलीवूड मध्ये सर्वात जास्त वेळा डबल रोल करण्याचा विक्रम केला आहे. अन महान या चित्रपटात ट्रिपल रोल केला आहे.

तर नावावरून सांगावे वाटते ते असे.. अमिताभ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या या महान नायकाने एक नव्हे दोन नव्हे तर चक्क 22 चित्रपटात “विजय” हे नाव धारण केले आहे.

बॉलीवूडमधील 74 इंच अशी सर्वात जास्त उंची असणाऱ्या अन स्वतःच्या कर्तुत्वाने एका परमोच्च उंचीवर पोहचलेल्या या महानायकाला स्मार्टचा सलाम..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here