श्रीदेवी च्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला बालपणीचा फोटो

0
189
श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला बालपणीचा फोटो | jhanvi shared photo childhood sridevis birthday

बॉलिवूडची चाँदनी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी चा वाढदिवस असून तिची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मिस करत असल्याचे पिंकविलाला एका मुलाखतीत सांगितले.

जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर श्रीदेवीसह आपल्या लहानपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी वडील बोनी कपूर आणि आई श्रीदेवीसह दिसते आहे. तिने आईला शुभेच्छा देत, आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जान्हवीने ‘धडक’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. पण दुर्देवाने जान्हवीचे हे यश पाहायला आज श्रीदेवी नाहीत. ‘धडक’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान जान्हवीला आईच्या आठवणीने फार गहिवरुन आले होते. जान्हवी म्हणाली होती की,’ आई नेहमी म्हणायची सैराटसारख्या सिनेमाद्वारे तू पदार्पण करावे,असे मला वाटते. पण आज हे पाहायला आई नाही.’
जान्हवी पुढे सांगते, ‘मी आईसोबत घरी ‘सैराट’ पाहिला होता. मला आठवते आहे की आई म्हणाली होती, माझा पहिला सिनेमा असा असता तर, पुढे आई खुप काही म्हणाली होती, सिनेमाबद्दल त्यावेळेस. मलासुद्धा असा सिनेमा, अशी भूमिका मिळायला हवी अशी आईची इच्छा होती. पुढे हे करण जोहर यांच्यामुळे शक्य झाले. आईने ‘धडक’ सिनेमाची पहिली २५ मिनिटे पाहिली होती, त्यावेळेच्या माझ्या मेकअपवरुन माझ्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. त्यानंतर ती अशीसुद्धा म्हणाली होती, की मध्यांतरानंतर तुझ्या चेहऱ्यावर मेकअप अजिबात दिसायला नको, पण एकूणच ती माझ्या या सिनेमाविषयी खुपच उत्सुक व खुश होती.’

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

पिंकविला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ते म्हणाले की, ‘श्री सतत आमच्यासोबतच आहे. आम्हाला तिची आठवण येत नाही असा एकही क्षण नाही’काही प्रख्यात व्यक्तीमत्त्व कधीच मरण पावत नाहीत. आम्हाला प्रत्येक क्षणी श्रीची आठवण येते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here