अभिनेत्री कंगना राणावत विरोधात पोलिसात तक्रार

0
236
अभिनेत्री कंगना राणावत विरोधात पोलिसात तक्रार | mumbai khar police summon bollywood actress kangana ranaut over real estate brokerage

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील पाली हिलमध्ये विकत घेतलेल्या बंगल्याचं ब्रोकरेज न भरल्याचा आरोप दोघींविरोधात आहे.

गेल्या वर्षी कंगना आणि रंगोली यांनी वांद्र्यातील पाली हिल परिसरात 20.07 कोटी रुपयांना बंगला विकत घेतला होता. मात्र या व्यवहारातील मध्यस्थाला संपूर्ण रक्कम (ब्रोकरेज) दिली नसल्याचा आरोप आहे. प्रकाश रोहिरा यांनी खार पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

सर्वसाधारणपणे एक टक्के ब्रोकरेज दिला जात असल्यामुळे तितकी, म्हणजे 20 लाख रुपयांची रक्कम कंगनाने भरल्याचं तिच्या टीमतर्फे सांगण्यात आलं आहे. मात्र आता तक्रारदारानेच ब्रोकरेज वाढवून 2 टक्के, म्हणजे आणखी 20 लाख मागितले आहेत. असा व्यवहार ठरलाच नव्हता, असा दावा कंगनाच्या वतीने करण्यात आला आहे.

कंगनाने सप्टेंबर 2017 मध्ये हा बंगला विकत घेतला होता. बंगल्याची जागा तीन हजार 75 चौरस फूट इतकी असून कंगनाने तो 20 कोटी 7 लाख रुपयांना विकत घेतला होता, तर 1 कोटी 3 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहिती आहे.

अधिक माहितीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here