VIDEO : पायाखालची जमीन सरकली, तरुणी गाडल्या गेल्या

0
488
VIDEO : पायाखालची जमीन सरकली, तरुणी गाडल्या गेल्या | sinkhole opening and swallowing two women

दियाबकीरएखादी धक्कादायक बातमी आली की आपल्याकडे ‘पायाखालची जमीन सरकली’ असं बोललं जातं पण प्रत्यक्षात जर पायाखालची जमीन सरकली आणि आपण त्यात गाडले गेलो तर काय होईल याचा विचारही साधा करवत नाही. तुर्कीमध्ये दोन तरुणींना अशाच प्रकारचा एक भयंकर अनुभव आला आहे. रस्त्यावरून गप्पा मारत निघालेल्या या दोघींच्या पायाखालचा रस्ता अचानकपणे खचला व त्या दोघी रस्त्याच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले मात्र या अपघातात दोघी चांगल्याच जखमी झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

तुर्कीतील दियाबकीर शहरातील एकाच रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. सुझान कुडे बालिक आणि नर्स ओझलेक दुयमाझ या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास रुग्णालयातील शिफ्ट संपवून त्या घरी निघालेल्या असताना ही दुर्घटना घडली. रस्त्याने बोलत चाललेल्या असताना अचानक त्यांच्या पायाखालचा रस्ता खचला व त्या रस्त्याच्या मलब्याखाली अडकल्या. त्यानंतर तत्काळ आजुबाजुच्या लोकांनी घटनास्थली धाव घेत त्याा दोघींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्या दोघींचीही प्रकृती स्थिर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here