फेसबूक चे कर्मचारी दुसरीकडे नोकरीच्या शोधात

0
46
फेसबूक चे कर्मचारी दुसरीकडे नोकरीच्या शोधात | facebooks employees looking for jobs

मुंबई : फेसबूकच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फेसबूक आपल्या युझर्सना नवनवीन सुविधा देण्याच्या प्रयत्नात असते. नुकत्याच फेसबुकवर व्हिडीओतून कमाई करण्याची संधी फेसबुकने दिली. अनेकांना फेसबूक आपल्या माध्यमातून रोजगार देत आहे, मात्र या फेसबूकच्या कामगारांवर दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याची वेळ आली आहे.

फेसबूकसोबत मागील काही महिन्यात अप्रिय घटना घडल्या. त्यात फेसबूक डेटा लीक प्रकरण घडल्याने, कंपनीच्या शेअर्सच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे फेसबूकचे कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम मिळतंय का याची चाचपणी करत आहेत.

सीएनबीसीच्या बातमीनुसार, फेसबूकचे कर्मचारी आपल्या माजी फेसबूकच्या कर्मचाऱ्यांना नोकरी शोधण्यासाठी सांगत आहेत. “आमच्यासाठी कामं शोधा”, असे फोन कॉल आम्हाला आमचे फेसबूकमध्य़े काम करणारे मित्र करतात, अशी माहिती फेसबूकच्या माजी कर्मचाऱ्यांनी सीएनबीसीला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here