महिला डॉक्‍टर चा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न

0
527
डॉक्‍टर-doctor-pune

पिंपरी (पुणे): प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या कारणावरून एका महिला डॉक्‍टर वर हल्ला करीत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला. ही घटना आज (शनिवार) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर संपावर गेले आहेत.

निलम उपाप या महिलेला प्रसुतीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफीमध्ये बाळ जिवंत होते. मात्र, प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी येथील महिला डॉक्‍टर प्रियांका यांच्या थोबाडीत मारली.

तसेच केस ओढत गळाही दाबण्याचा प्रयत्न केला. तर प्रसुती दरम्यान बाळ दगावले तर आम्हाला उशीरा का सांगितले, असा सवालही नातेवाईकांनी केला.

रुग्णाच्या नातेवाईकांचे कृत्य; वायसीएममधील डॉक्‍टर संपावर

बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेली होती. या गोष्टी सोनोग्राफीत दिसत नाहीत. त्यामुळे प्रसुती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला, असा खुलासा वायसीएम रुग्णालयाच्यावतीने करण्यात आला.

मराठी चित्रपटांची गर्दी, एकाच दिवशी 7 सिनेमे प्रदर्शित

याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर संपावर गेले आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी अशाच प्रकारे तोडफोड केली होती.

अधिक माहितीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here