‘पीएमपी’ बस थांब्यांचे विद्रुपीकरण कधी थांबणार?

0
151
पीएमपी' बस थांब्यांचे विद्रुपीकरण कधी थांबणार | hoardings on pmpml bus stop

पिंपरी – शहरातील अनधिकृत होर्डींग, फ्लेक्‍स, व बॅनर मुळे शहराचे विद्रुपीकरण होत असताना पीएमपी बस स्थानके देखील त्यातून सुटले नाहीत.

पुण्यात झालेल्या होर्डिंगच्या अपघातात 4 नागरिकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना घडल्यावर काही दिवस अनधिकृत होर्डींग वर कडक कारवाई करण्यात आली. मात्र अलिकडच्या काळात पुन्हा बेकायदेशीर फ्लेक्‍स, होर्डींग, शहराच्या विविध भागात खुलेआम झळकत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लाईफलाईन असलेल्या पीएमपीच्या बस थांब्यांना अनधिकृत जाहिरातीचे बॅनर, होर्डींग लावले जात आहे. मात्र याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून डोळेझाक केली जात आहे.
शहरातील अनधिकृत होर्डींग काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका करोडो रुपये खर्च करते, मात्र तरी सुद्धा शहरातील होर्डींग, फ्लेक्‍स, बॅनर ‘जैसे थे’ अवस्थेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीएमपी बस थांब्यावरील गाड्यांचे वेळापत्रक देखील होर्डींग आणि बॅनरमुळे झाकले जात आहे.

पीएमपीच्या बऱ्याच बस थांब्यांवर बसायला जागा नाही. जेथे जागा आहे तेथे अनधिकृत बॅनरमुळे वेळापत्रक दिसत नसल्याने गाडीच्या वेळा समजत नाही, किंवा कुठली गाडी स्थानकावर थांबते किंवा थांबत नाही याबाबत माहिती मिळत नाही. यामुळे स्थानकावर न बसता रस्त्यावर गाड्यांचे फलक वाचायला रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभे राहावे लागत आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी अशी नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here