दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलर बंदीची याचिका

0
42
दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलर बंदीची याचिका | hc dismisses plea against accidental prime minister

नवी दिल्ली – काँग्रेस पक्ष कार्यकर्ते द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाला विरोध करीत असून या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कसे सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर काम करीत होते असे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून स्पष्ट असल्यामुळे हा ट्रेलर प्रसारित होऊ नये आणि त्यावर बंदी आणली जावी यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती.

द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टरच्या ट्रेलरवर बंदी आणण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. सिंगल बेंच असलेल्या दिल्ली न्यायालयाने ही याचिका रद्द ठरवली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याला यासाठी डिव्हीजन बेंचकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. ११ जानेवारी रोजी द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण एका बाजूला या चित्रपटावर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. ठरल्यावेळी हा चित्रपट रिलीज होईल का यावर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here