महिन्यातून एकदा पीएमपीएलने मोफत प्रवास करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल

0
48
महिन्यातून एकदा पीएमपीएलने मोफत प्रवास करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल | one day free bus service cancel

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे अधिकाधिक नागरिकांनी आकर्षित व्हावे म्हणून पीएमपीएलने महिन्यातून एकदा मोफत बस प्रवास’ उपक्रमाचे नियोजन केले होते. मात्र, वर्षाच्या 12 दिवसांसाठी तब्बल 4 कोटींचा भार पडत असल्याचे कारण देत स्थायी समितीने तो प्रस्ताव दप्तरी दाखल केला आहे.

नागरिकांनी बसने प्रवास करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी दर महिन्यातून एक दिवस मोफत बस प्रवास सवलत योजना पीएमपीएलने आखली होती. परंतु, स्थायी समितीने तो प्रस्ताव दप्तरी दाखल केला आहे.

सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, योजनेअंतर्गत वर्षातील 12 दिवसासाठी पालिकेवर तब्बल 4 कोटींचा खर्चाचा वाढीव भार पडणार आहे. पालिका दर महिन्यास पीएमपीएलला संचलन तुटीपोटी 7 कोटी 50 लाख रूपये अदा करीत आहे. या वाढीव 4 कोटींच्या खर्चाच्या बदल्यास दरमहा सुमारे 30 ते 35 लाख रूपये पालिकेस पीएमपीएलला अदा करावे लागणार आहेत.

एलबीटी बंद झाल्याने पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करता येत नसल्याने समितीने सदर विषय दप्तरी दाखल करून फेटाळून लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here