भारतीय टेबल टेनिस संघासाठी एअर इंडिया हाऊसफुल

0
221
Air India plane Housefull for Indian Table Tennis Team

Air India plane Housefull for Indian Table Tennis Teamमुंबई / नवी दिल्ली- मेलबर्न येथील जागतिक टेबल टेनिस मालिकेतील स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय महिला संघास एअर इंडियाने फ्लाईट ओव्हरबूक्‍ड असल्याचे सांगत प्रवेश नाकारला. अखेर उच्च स्तरावरील हस्तक्षेपानंतर आज दुपारी रवाना होणारा संघ रात्री 10.30 च्या विमानाने मेलबर्नला रवाना होईल, असे सांगण्यात आले.

मेलबर्नला सोमवारपासूनच आयटीटीएफ जागतिक टूर मालिकेतील स्पर्धा आहे. यातील पात्रता फेरीच्या लढती 24 आणि 25 जुलैस होणार आहेत; मात्र एअर इंडियाने भारतीय संघातील 17 पैकी 10 खेळाडूंनाच नवी दिल्लीहून दुपारी 12.30 वाजता रवाना होणाऱ्या विमानात प्रवेश दिला. मनिका बत्रा, मधुरिका पाटकर, मौमा दास यांच्यासह सात खेळाडूंना प्रवेशच नाकारण्यात आला.

राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णयश संपादलेल्या मनिकाने ट्विटरवरून या संदर्भात क्रीडा मंत्रालय तसेच पंतप्रधानांकडे दाद मागितली. एअर इंडियाने त्या वेळी या सर्व खेळाडूंना रविवारी दुपारच्या 12.30 च्या विमानाच्याऐवजी सोमवारी दुपारी 12.30 च्या विमानाने प्रवास करता येईल असे सांगितले. या विमानाने प्रवास केला तर हे सात खेळाडू मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता पोहोचणार होते. या परिस्थितीत त्यांना लढतीसही मुकावे लागले असते. मनिकाच्या ट्विटची लगेच दखल घेण्यात आली. सूत्रे वेगाने हलवण्यात आली आणि सात खेळाडूंसाठी रात्री 10.30 च्या विमानात व्यवस्था करण्यात आली.

क्रीडा मंत्रालयाने योग्य प्रकारे आरक्षण केले होते; पण एअर इंडियाने अन्याय केला. त्याचा फटका निष्कारण खेळाडूंना बसला आहे. त्यांना स्पर्धेपूर्वी पूर्वतयारीस पुरेसा वेळ मिळणार नाही. लढतीच्या ठिकाणी सरावही होणार नाही, असे भारतीय टेबल टेनिस संघटनेचे सचिव एम. पी. सिंग यांनी सांगितले. त्यांनी मागे राहिलेल्या सात खेळाडूंमध्ये हरमीत देसाई, मार्गदर्शकही आहेत, असेही सांगितले.

फ्लाईट ओव्हरबोर्ड असल्यामुळे आम्हाला निवासासाठी मेहरुली – गुरगाव रोडवरील हॉटेल देण्यात आले. हे हॉटेलही चांगले नव्हते. महिलांना राहण्यासाठी योग्य नव्हतेच. त्यामुळे आम्ही खेळाडूंनी आमच्याच खर्चाने फोर स्टार हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था केली. – मधुरिका पाटकर 

अधिक माहितीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here