या १४ वर्षीय क्रिकेटपटूची वादळी खेळी, चोपल्या नाबाद ५५६ धावा

0
181
या १४ वर्षीय क्रिकेटपटूची वादळी खेळी, चोपल्या नाबाद ५५६ धावा | 14 year old priyanshu moliya scored 556 runs

श्री डीके गायकवाड या चौदा वर्षाखालील स्पर्धेत १४ वर्षीय प्रियांशु मोलियाने नाबाद 556 धावा केल्याने सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेल्या प्रियांशुने दोन दिवसांमध्ये वडोदरा क्रिकेट अकादमीच्या (व्हीसीए) मैदानावर हा पराक्रम केला.

राजकोटमधून बडोदामध्ये स्थलांतर केलेल्या प्रियांशुला मोहिंदर अमरनाथ अकादमीमध्ये क्रिकेटच्या कौशल्य दाखवल्याने उत्तम वाटत आहे. तसेच संघाकडून खेळल्याचा गर्व आहे.

फलंदाजी बरोबरच प्रियांशुने गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केली आहे. प्रथम गोलदांजी करताना त्याने पहिल्या डावात चार विकेट्सही घेतल्या. तसेच त्याच्या संघाने विरुद्ध संघ योगी क्रिकेट अकादमीला 52 धावांमध्ये सर्वबाद केले. मग फलंदाजीला येताना त्याने पहिल्या दिवशी 408 धावा केल्या. दुसऱ्या दिवशीही तोच फॉर्म कायम ठेवताना त्यामध्ये 148 धावा जोडल्या. यामुळे त्याने 319 चेंडूत 98 चौकार आणि एक षटकारच्या सहाय्याने नाबाद 556 धावा केल्या.

प्रियांशुने केलेल्या या वादळी खेळीने त्याच्या संघाचे चार विकेट्स गमावत 826 धावा झाल्या.

“मागच्या वर्षी याच स्पर्धेत मी 254 धावा केल्या होत्या ज्या माझ्या सर्वोच्च धावसंख्या होत्या. मी माझा नैसर्गिक खेळ करत होतो. पहिले शतक झाल्यावर मला अजून 200 धावा त्यामध्ये जोडायच्या होत्या हे मी स्वत:ला म्हणत होतो”, असे प्रियांशु म्हणाला.

यावेळी प्रियांशूने त्याचे पहिले प्रशिक्षक अनिल ठकराल यांचे आभार मानले. तसेच त्याने हे पण सांगितले की त्याच्या खेळीने त्याचे वडिल आणि अमरनाथ हे खूप खूष आहेत.

“मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितले तेव्हाच मला समजले की त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. त्याच्यामध्ये खूप गुण असून तो पुढे आणखी उत्तम खेळेल”, असे अमरनाथ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here