iPhone X च्या Preorder तारीख जाहीर….प्रतीक्षा संपली

0
250
iPhone X - आयफोन X
आयफोन X

मुंबई : भारतातील Apple प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Apple च्या iPhone X च्या प्रि-ऑर्डरची तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 ऑक्टोबरपासून ‘आयफोन एक्स’ ची प्रि-ऑर्डर सुरु होणार आहे.

3 नोव्हेंबर रोजी ‘iPhone X’ भारतात लॉन्च होणार आहे. म्हणजेच, लॉन्चिंगच्या आठवडाभर आधीच आयफोन एक्सची भारतात प्रि-ऑर्डर सुरु करण्यात येत आहे.

iPhone X च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89 हजार, तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1 लाख 2 हजार रुपये असेल, अशी माहिती मिळते आहे.

यावेळी 3 नोव्हेंबर रोजी भारतासह अमेरिका आणि इंग्लंडमध्येही आयोफोन एक्स लॉन्च केला जाणार आहे. मात्र भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँग काँग, जपान, रशिया, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्येही 27 ऑक्टोबरपासूनच प्रि-ऑर्डर सुरु केली जाणार आहे.

ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर फेसबुक प्रमाणे आता व्हॉट्सअॅपवर ही!

5.8 इंच स्क्रीन आयफोन एक्सला असेल. आयफोन 8 चा स्क्रीन 5.5 चा आहे. म्हणजेच पॉईंट 3 ने मोठा स्क्रीन आयफोन एक्सचा आहे. या आयफोनच्या माध्यमातून अॅपल पहिल्यांदाच फेस आयडी टेक्नोलॉजी आणणार आहे.

27 ऑक्टोबरला प्रि-ऑर्डर केल्यानंतर apple आयफोन एक्स हातात येण्यासाठी अर्थात आठवड्याभराची वाट पाहावी लागणार आहे.

अधिक माहितीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here