अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर आज दुपारपासून बंपर सेल

0
173
Amazon and flipkart sale

Amazon and flipkart saleमुंबई : फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन इ कॉमर्स कंपन्यांचा आजपासून बंपर सेल सुरु होत आहे. अॅमेझॉनवर आज दुपारी बारा वाजेपासून हा सेल सुरु होणार आहे. सेलमध्ये अनेक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर फ्लिपकार्टचाही बिग शॉपिंग डे आजपासून सुरु होतो आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या पडण्याची शक्यता आहे.

अॅमेझान कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे, तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि अन्य वस्तू ऑफरमध्ये उपलब्ध असतील. या सेलमध्ये जवळपास 200 वस्तू एक्सक्लुझिव्ह लॉन्च केल्या जाणार आहेत.
अॅमेझॉनवरील डिल्सचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना प्रथम प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. कंपनीने यामध्ये दोन प्लान दिले आहेत. युजर्स एका महिन्यासाठी 129 रुपयांचा प्लान घेऊ शकतात किंवा वर्षभरासाठी 999 रुपयांचा प्लान घेऊ शकतात.
फ्लिपकार्टने सेलमध्ये 1500 हून जास्त स्मार्टफोन्सवर सूट देण्याची तयारीत आहे. गुगल पिक्सल 2 (128 जीबी) स्मार्टफोन ग्राहकांना 42999 रुपयांना मिळणार आहे. हॉनर 9i (4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज) हा स्मार्टफोन 14999 रुपयांना विकण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यापर्यंत सूट देण्यात येत आहे. गृहपयोगी वस्तू आणि टीव्हीवर 70 टक्के सूट मिळणार आहे.

via अधिक माहितीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here