धनकवडी-कात्रज-आंबेगाव परिसरातील विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी

पुणे, दि. १० जून २०२६ : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  यांनी मंगळवारी धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या तक्रारींशी संबंधित विषयांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना तातडीच्या सूचना दिल्या.

पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी धनकवडी येथील राजर्षी शाहू बँक परिसरातील पार्किंग व्यवस्था, पदपथावरील वाहनतळ आणि फ्रंट मार्जिनमधील बांधकामांची तपासणी केली. त्यानंतर तीन हत्ती चौकाजवळील राऊत बाग परिसरातील मलनिस्सारण व्यवस्था आणि पावसाळी जलवाहिन्यांच्या कामांचा आढावा घेतला. मोहननगर परिसरातील भूमिगत जलवाहिन्यांच्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

त्रिमूर्ती चौकाजवळील पीआयसीटी (PICT) आणि भारती विद्यापीठ परिसरातील फ्रंट मार्जिनमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत दुकानांबाबतही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच सरहद चौक ते कात्रज डेअरी कॉर्नरदरम्यानच्या रस्त्याच्या समतलीकरणाचे काम, सरहद चौक रुंदीकरण, राजमाता भुयारी मार्ग विस्तार आणि नवले पुलाशी संबंधित प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला.दौऱ्यादरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची माहिती घेऊन आयुक्तांनी आवश्यक त्या कार्यवाहीसाठी स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी व सूचनांवरही तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यास खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. भीमराव तापकीर, प्रभागातील मा. सदस्य सौ. वर्षाताई तापकीर, मा. सौ. तेजश्री बदक, मा. शिक्षण सभापती श्री. अरुण राजवाडे, मा. श्री. व्यंकोजी खोपडे, मा. माजी सदस्य श्री. युवराज बेलदरे इत्यादी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मुख्य अभियंता (ड्रेनेज), पथ विभाग, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, मा. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन), अतिक्रमण विभागाचे अधिकारी, मा. सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन), संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे मा. सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणी दरम्यान नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, सूचना आणि विविध विकासकामांच्या अनुषंगाने मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी स्पष्ट निर्देश दिले.

See also  नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया