केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी

पुणे : आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभर तीव्र आंदोलने करण्यात येत असतानाच पुण्यातही आम आदमी पक्षाच्या वतीने मोदी सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करून निषेध करण्यात आला.

सत्याचा असत्यावर विजय या हेतूने देशभरात होलिका दहन केले जाते, त्यामुळे आम आदमी पक्ष पुणे च्या वतीने देखील आज मोदी सरकारच्या असत्य वागण्याचा निषेध म्हणून मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाला ४१ कंपन्यांकडून त्यांच्यावर ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणेद्वारे टाकल्या गेलेल्या छाप्यानंतर २,४७१ कोटी रुपयाचे डोनेशन्स दिले गेल्याचे एसबीआय ने दिलेल्या माहिती दिसून येत आहे. इतक्यात मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणांनी धाडी घातल्यानंतरचं कंपन्यांनी भाजप सरकारला डोनेशन का दिले असा प्रश्न यामुळे आता निर्माण होत आहे? भाजप व तथाकथित मद्य घोटाळ्यातील अर्विंदो फार्मा यांचे संबंध उघड झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे हा घोटाळा असल्याचे म्हंटल्यावरही  भाजपाला मिळणाऱ्या डोनेशनची कोणत्याही प्रकारे चौकशी अद्याप झाली नसल्याचे दिसून येत असल्याने भ्रष्टाचाराचा सूत्रधार भारतीय जनता पार्टी आहे असे आम आदमी पक्षाचे राज्यप्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले, आपल्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाखाली *”सत्यमेव जयते”* असे लिहिलेले असते परंतु मोदी सरकारच्या असत्य कारभारामुळे सर्व देशवासीयांना मोदी सरकारचे काम हे असत्यमेव जयते या विचारानेच सुरू आहे अशी भावना निर्माण झालेली आहे.

मोदी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला अनेक सुविधा मोफत उपलब्ध करून देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर आत्तापर्यंत कोणतेही आरोप सिद्ध करण्यात यश आलेले नाहीत, त्यामुळेच निराशेपोटी मोदी सरकार केजरीवालां विरोधात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे. *धनंजय बेनकर, आम आदमी पक्ष, पुणे शहर अध्यक्ष*

आम आदमी पक्षाच्या वतीने सदर आंदोलनास सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, सुरेखा भोसले, सतीश यादव, अक्षय शिंदे, किरण कांबळे, नौशाद अन्सारी, अमोल मोरे, बालाजी कंठेकर, शंकर पोटघन, समीर आरवाडे, सुदर्शन जगदाळे, अभिजीत गायकवाड, प्रशांत कांबळे, सुनील सावडी, बाळासाहेब भारती, विक्रम गायकवाड, मनोज एरंडकर, ॲन अनिष, संजय कटारनवरे, श्रीकांत चांदणे, शाहीन अत्तार, अली सय्यद, सुनील विठ्ठल भोसले, इकबाल तांबोळी, ज्ञानेश्वर गायकवाड, रितेश निकाळजे, तानाजी शेरखाने, स्वप्निल गोरे, ॲड. गुणाजी मोरे, उमेश दीक्षित
ॲड.अमोल काळे, तुकाराम शिंदे, सेंथील अय्यर, असगर बेग, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, शहाजी मोळके, मुकुंद किर्दत, सुरज सोनवणे, सुनील शहाबाजी भोसले, कुमार धोंगडे, संदीप सूर्यवंशी, निखिल खंडागळे, अविनाश केंदळे, संतोष काळे, ॲड.बाळासाहेब पोखर, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, अमित म्हस्के, शंकर थोरात, शीतल कांडेलकर, किरण कद्रे, ऋषिकेश मारणे, शिवाजी डोलारे, ॲड. गणेश थरकुडे, अनिल कोंढाळकर, अप्पा कोंढाळकर, प्रीतम कोंढाळकर, मायकल मस्करेन्हास, आरती करंजावणे छाया भगत संदेश दिवेकर, शशीभूषण होले, शेखर शिवाजी ढगे, उमेश बागडे,पाडळे रवींद्र, ॲड.गुनाजी मोरे, अनिस वर्गीस, ॲड.कुणाल नारायण घारे, सचिन कोतवाल, मिलिंद सरोदे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  मणिपूर मध्ये झालेली घटनांच्या निषेधार्थ बीएसएनएल ऑफिस मध्ये बी.एस.एन. एल. एम्प्लाईज युनियन, आणि बी.एस.एन.एल. वर्कींग वुमैन को-आर्डीनैशन कमिटी आणि आल इंडिया बी.एस.एन.एल.DOT पेन्शनर्सर असोसिएशन निदर्शने.