बाणेर येथील महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यालगत असलेला दुर्गंधीयुक्त कचरा व निरोपयोगी सिमेंट पाईप उचलण्याची बाणेर बालेवाडी भाजपा अध्यक्ष सुभाष भोळ मागणी

बाणेर : बाणेर येथे किया शोरूम जवळ महामार्ग लगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे तसेच सिमेंटचे पाईप पडले असल्याने याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची पाहणी भाजपा बाणेर बालेवाडी अध्यक्ष सुभाष भोळ यांनी केली व औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी गिरीश दापकेकर यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

बाणेर येथील महामार्ग लगत पालिकेच्या कामावरील सिमेंटचे पाईप पडले आहेत यामुळे निर्माण झालेल्या आडोशाला या परिसरातील अनाधिकृत हॉटेल तसेच रात्री अपरात्री नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. महामार्गाच्या सर्विस रस्त्यावरून जाताना यामुळे नाक मुठीत घेऊन नागरिकांना चालावे लागते. किया शोरूम च्या जवळच अनेक नागरिक बसची वाट पाहतात यामुळे या परिसरामध्ये सर्विस रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे तसेच परिसरातील निरोपयोगी असलेले सिमेंटचे पाईप उचलण्यात यावेत तसेच कचरा साफ करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

भाजपा बाणेर बालेवाडी अध्यक्ष सुभाष भोळ यांच्याकडे या परिसरातील सोसायट्यांनी तक्रारी केल्या होत्या. भोळ यांनी नी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी या परिसरात उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी पाहणी केली. तसेच सर्विस रस्त्याच्या प्रश्नांबाबत कोथरूडचे आमदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले.

See also  खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार त्यांच्याशी विविध समस्यांबाबत चर्चा