पिंपरी चिंचवडमध्ये करोनाची रुग्ण संख्या वाढली असून शहरात सध्या ११९ सक्रिय रुग्ण

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या १५ दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दिवसाला २०हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत असून रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. सध्या ११९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी केवळ तीन रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल असून उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

गेल्या सात- आठ महिन्यांमध्ये करोनाचे रूग्ण आढळून येत नव्हते. ९ मार्चपर्यंत शहरात एकही सक्रिय रुग्ण नव्हता. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पुन्हा रुग्ण आढळत आहेत. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे रूग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेऊन बरे होत आहेत.

२२६२ जणांची चाचणी, २५५ बाधित..
गेल्या आठ दिवसांत शहरातील दोन हजार २६२ जणांनी करोनाची चाचणी केली. त्यापैकी २५५ जणांचे अहवाल सकारात्मक आले. या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती. त्यामुळे घरीच उपचार घेवून बरे होत आहे. पाच दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण करोनामुक्त होत आहेत. आजपर्यंत १३६ जण करोनामुक्त झाले. सद्यस्थितीत शहरात ११९ सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील केवळ तीन रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

See also  पशुसंवर्धन विभागाचा भरती प्रक्रियेत ढिसाळ कारभार