राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवीदिल्ली : राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करत लोकसभा सचिवालयाने आज त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गुरुवारी (23 मार्च) सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला.
एक दिवसापूर्वी, गुजरातमधील सुरत न्यायालयाने राहुल गांधींना त्यांच्या विधानासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.

लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपाच्या पूर्णेश मोदी यांनी केला होता. या संदर्भात कोर्टात केस दाखल केली होती.

देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.

See also  कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील सर्व गृहनिर्माण संस्थेत शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान