बाणेर : बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटल जवळील कळमकर चौकामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
बालेवाडी परिसरातून पिंपळे निलख व औंध कडे जाणाऱ्या वाहनांमुळे ज्युपिटर हॉस्पिटल समोरील रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे चौकामध्ये सातत्याने होत असलेली कोंडी सोडवण्यासाठी वार्डनची नियुक्ती करून देखील वाहतूक कोंडी सुटत नसल्याने अखेर सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे.
यामुळे बालेवाडी फाटा, बालेवाडी रस्ता, बाणेर स्मशानभूमी रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल, तसेच जुपिटर हॉस्पिटल समोरील कळमकर रस्ता या परिसरातील वाहतूक कोंडी काही अंशी सोडवण्यास मदत होणार आहे.