समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी दिवसाचे आयोजन

पुणे : समाज कल्याण विभाग आणि पुणे मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नेविल वाडिया इन्स्टिट्युट ऑफ स्टडीज अँड रिसर्च, वाडिया कॉलेज कॅम्पस यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिवसाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. अशोक चांडक, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ. एम पी डाळे, नेस वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य वृषाली रणधीर, नेविल वाडियाचे महाविद्यालयाचे संचालक डॉ. ए. बी. दडस, शिष्यवृत्ती समन्वयक सुयश राऊत, समान संधी केंद्र समन्वयक डॉ सुशांत जाधव, बार्टीचे प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, बार्टी समतादूत, अधिकारी, कर्मचारी, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

श्री. लोंढे यांनी विद्यार्थ्यांस विद्यार्थी दिवसाचे महत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, जीवन जगण्याची प्रेरणा, स्पर्धा परीक्षा, व्यायाम, बदलती जीवनशैली व जागतिक घडामोडी या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकाचे निरसन केले.

See also  भाजपा ओबीसी सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी राजेंद्र पाषाणकर यांची नियुक्ती