“ पंन्नास खोक्यावाल्यांचे सरकार आता शंभर खोक्याची तयारी करत आहे”. मल्लिकार्जुन खर्गेंचे अस्सल मराठीतून महायुतीच्या सरकारवर टीकास्त्र.

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट मधील कॅांग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिंदे फडणविस सरकारच्या कारभारावर व भाजपच्या खोट्या प्रचारावर जोरदार हल्ला चढवला. सभेत शरदचंद्र पवार यांनीही महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी मतदारांना आवाहन केले.


पवार म्हणाले, ‘ गेली जवळज १० वर्ष भाजपचे सरकार केंद्रात व राज्यात आसताना १ नंबरचा महाराष्ट्र ८ व्या नंबरला गेला आहे. राज्याची अधोगती सुरु आहे. आम्ही उद्योगधंदे MIDC आणल्या पण हे भाजपला टिकवता व वाढवता आले नाहीत. महाराष्ट्र पुन्हा प्रगती पथावर आणण्यासाठी आम्हाल जनतेची साथ हवी आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन शरद पवारांनी केले.


मल्लिकार्जुन खर्गे यांनी अस्सल मराठीतून बोलताना अनेक विषयांना हात घातला. नेहरुनी औद्योगीक विकासाला प्राधान्य दिल्याने  पुण्या मुंबई सारख्या शहरांची व देशाची भरभराट झाली. हे भाजपवाले व पुर्वीचे जनसंघ वाले संविधान विरोधी आहेत व आजही देशात दुही पसरवत आहेत. मोदी व शहा हे सतत खोटे बोलतात. सगळे आम्हीच केले म्हणतात. ‘नशिब हे पुणे शहर पण आम्हीच बसवले असे म्हणत नाहीत’ अशी मजेदार चपखल खर्गेनी मारली.  पुढे खर्गेनीं महाविकास आघाडीची पंचसूत्री आश्वासने वाचुन दाखवली व ते पुर्ण करण्याचे आश्वासन देताना. भाजपच्या द्वेश पसरवणार्या व ‘एक है तो सेफ है’  प्रचाराला राहुल गांधीचा ‘मोहब्बत की दुकान’ हा विचार हरवणार असल्याचे सांगीतले.


“हम सब एक है” चा नारा देत त्यांनी रमेश बागवे,  दत्ता बहिरट व रविंद्र धंगेकरांसाठी मत मागितले. सभेत अविनाश बागवे, ॲड. जयदेवराव गायकवाड, शिवरकर, ॲड वंदना चव्हाण व यांनी उपस्थीतांना सबोंधीत केले.पुणे कॅांग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेने शरद पवार व मल्लिकार्जुन खर्गेचे यांचे स्वागत केले. विवध सामाजिक संघटनांनी या वेळी शरद पवार व मल्लिकार्जुन खर्गेचे स्मुर्ती चिन्ह देऊन सन्मान केला.

See also  श्रेय वादाच्या २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनानंतर तरी पाणी मिळणार का?- वंचित बहुजन आघाडी