शिरूर तालुक्यातून बिबटे महिन्याच्या आत हद्दपार करा आणि नुकसान भरपाई मध्ये वाढ करा! बापूसाहेब काळे

शिरूर : शिरूर तालुका बिबटया हद्दपार जनआंदोलनासाठी शिरूर तहसील कार्यालय या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन करण्यात आले होते.त्या आंदोलनात जर एक महिन्याच्या आत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रास्ता रोको स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाला शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला. यावेळी बापूसाहेब काळे बोलत होते.शिरूर तालुक्यात बिबट्या ने केलेल्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रथम श्रद्धांजली वाहून आंदोलनास सुरुवात झाली.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबुत, आलेगाव पागा, निमगाव म्हाळुंगी,रांजणगाव सांडस, भांबर्डे,उरळगाव, इनामगाव, मांडवगण फराटा या गावांसह अनेक गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा प्राणघातक हल्ले झाल्यामुळे जीव गमवावा लागला असून संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठया प्रमाणात भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे.या त्रासावर वन विभागातील प्रशासनाने शिरूर तालुक्यातील सर्व बिबट्या एका महिन्यात हद्दपार करावे आणि ग्रामस्थांना  व शेळ्या मेंढ्या गाय वासरे पाळीव प्राणी मिळणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्यात यावी  या मागणीसाठी तसे निवेदन तहसील कार्यालय, वनविभाग, व पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे तसेच गणेश नाईक साहेब वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कार्यालया मार्फत फॅक्स द्वारा एक प्रत पाठवण्यात आली आहे, व आमदार बापूसाहेब पठारे यांना देखील  देखील एक प्रत आलेगाव पागा या ठिकाणी देण्यात आली आहे, आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपण या समितीच्या मागण्याच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये आवाज उठवला असल्याचे सर्व समितीचे पदाधिकारी यांना सांगितले असे शरदराव रासकर सचिव शिरूर तालुका बिबट्या हद्दपार जन आंदोलन संघर्ष समिती यांनी माहिती दिली आहे. तहसील कार्यालय, शिरूर  हे आंदोलन शांततेत पार पडले
“बिबटे हद्दपार करा – ग्रामस्थांचा आणि पाळीव प्राण्यांचा जीव वाचवा!” अशा स्वरूपाच्या घोषणा देखील या ठिकाणी देण्यात आल्या

See also  श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत श्री रामेश्वर पॅनेलचा एकतर्फी विजय

आंदोलनाद्वारे खालील मागण्या प्रशासनास सादर केल्या
1 )सर्व बिबट्यांना शिरूर तालुक्यातून पकडून जिल्ह्याबाहेरील जंगलाच्या ठिकाणी हलवावे.
2 ) बिबट्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात यावी आणि ग्रामपातळीवर वन विभागाचे नियंत्रण केंद्र स्थापन करावे
3 )नुकसानभरपाई तात्काळ द्यावी
4 )जनजागृती व रात्रीच्या सुरक्षा गस्त वाढवावी.
5 ) रेस्क्यू टीम मध्ये तरुणांना संधी घ्यावी 

6 ) गावच्या लोकसंख्या नुसार तसेच वन विभाग क्षेत्रानुसार किमान एका गावातून पाच रेस्क्यू टीम मेंबर भरती व्हावी.           7) ज्या गावांमध्ये जास्त वनक्षेत्र आहे अशा प्रत्येक गावामध्ये वन विभागाच्या चारी बाजूने तारेचे भक्कम असे कंपाउंड करण्यात यावे.8 ) रेस्क्यू टीम नवीन भरतीसाठी प्रत्येक युवकांना मानधन देण्यात यावे तसेच टॉर्च ड्रेस व सर्व सुविधा देण्यात यावे.9 ) प्रत्येक गावात एक वनरक्षक तसेच पाच रेस्क्यू टीम मेंबर यांची नेमणूक करण्यात यावी.10 ) वन विभागाच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये जास्त बिबट हल्ले होतात अशा गावात काही ठिकाणी  हायमॅक्स दिव्याची व्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे चे व्यवस्था करण्यात यावी 11 ) वनरक्षक यांनी नेमणूक दिलेल्या गावांमध्येच मुक्काम करणे बंधनकारक करण्यात यावे 12 ) बिबट्या पकडल्यानंतर बिबट्याचे तात्काळ नसबंदी करण्यात यावी. 13 ) मानव हल्ल्या करणाऱ्या बिबट्या  यांना तात्काळ गोळ्या घालून मारून टाकण्यात यावे 14 ) पिंजऱ्यात पकडलेले बिबटे कुठेतरी लांब अभयारण्य किंवा सुरक्षित बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात यावे. अशा प्रकारे अनेक मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात  आलेहोते.

या आंदोलनात शिरूर तालुक्यातील सर्व गावांमधून ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवक यांनी आपल्या न्याय व हक्कंसाठी चांगला प्रतिसाद दिला. हे आंदोलन शिरूर तालुक्यातील बिबट्या हद्दपार संघर्ष जन आंदोलन समिती या माध्यमातून करण्यात आले समितीचे अध्यक्ष बापूसाहेब काळे,उपाध्यक्ष नामदेव गिरमकर , कार्याध्यक्ष दादासाहेब बेंद्रे,  दादा पवार , अशोकराव गाजरे , नामदेव काळे, विजय बेनके , राहुल वाघचौरे सह अनेक शिरूर तालुका बिबट्या हद्दपार जनआंदोलन समिती पदाधिकारी सह अनेक शेतकरी,माता- भगिनी  यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या समीती मध्ये शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावातील पाच सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे , तसेच या आंदोलनासाठी  मेजर तुकाराम डफळ कार्याध्यक्ष जनसेवक सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र राज्य, राजू शेख, अनुलोम चे बाजीराव येळे, अजित डोंगरे, प्रमोद जोशी,हुसेन शेख, समितीचे दादासाहेब बेंद्रे, नामदेव गिरमकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केली.विकास जाधव शेतकरी संघटना,अंकुश जाधव अध्यक्ष शिरूर तालुका मातंग एकता आंदोलन,मा सैनिक कैलास वाघचौरे,आदी सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे अशी माहिती शरदराव रासकर सचिव शिरूर तालुका हद्दपार जनआंदोलन संघर्ष समिती यांनी माहिती दिली आहे.