हवेली :हवेली तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली असून, सर्वच गट व गणांमध्ये निवडणूक वातावरण तापले आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ पेरणे येथून प्रदीप वसंत कंद, योगेश बाजीराव झुरुंगे, किरण संपत साकोरे व मंदाकिनी संपत साकोरे यांच्यात लढत आहे.
गट क्रमांक ३८ कोरेगाव मूळ येथे कविता विजय पायगुडे, सुरेखा शिवाजी भोरडे, दीपाली केतन निकाळजे, नलिनी बाळासो गावडे, प्रियंका संदीप जगताप, सायली पराग वाबळे, हर्षदा कुशल सातव व तेजश्री तानाजी हरगुडे अशी बहुपक्षीय रचना दिसते.
गट क्रमांक ३९ उरुळीकांचन मध्ये अनिल रामू कदम, जितेंद्र बाळासाहेब बडेकर, शंकर उत्तम बडेकर, महादेव शंकर कांबळे, जीवन नामदेव शिवे व योगेश नारायण सातपुते रिंगणात आहेत.
गट क्रमांक ४० थेऊर येथे कोमल पंकज आवाळे, पल्लवी युवराज काकडे व ऋतुजा प्रकाश सावंत यांच्यात स्पर्धा आहे.
गट क्रमांक ४१ लोणी काळभोर व ४२ खेडशिवापूर या गटांत महिला व अपक्ष उमेदवारांची उपस्थिती लक्षणीय आहे.
पंचायत समिती स्तरावर ७३ लोणीकंद, ७४ पेरणे, ७५ केसनंद, ७६ कोरेगाव मूळ, ७७ उरुळीकांचन, ७८ सोरतापवाडी, ७९ थेऊर, ८० आव्हाळवाडी, ८१ कदमवाकवस्ती, ८२ लोणी काळभोर, ८३ खेडशिवापूर व ८४ खानापूर या सर्व गणांत निवडणूक होत आहे. छाया ज्ञानेश्वर बाळके, धर्मेंद्र महादेव गावडे, कुशाल गोरख सातव, हर्षदा कुशल सातव, अमोल त्रिंबक टेकाळे, ज्ञानेश्वर सूर्यकांत नामुगडे, शरद मुरलीधर जावळकर व किसन मारुती जोरी ही नावे चर्चेत आहेत.
निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडत असल्याचे स्पष्ट केले आहे. विकास, पाणीप्रश्न व स्थानिक नेतृत्व हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहणार असल्याचे चित्र आहे.























