LIC च्या शेअर्स मध्ये ४० % ची घसरण.

मुंबई : LIC च्या शेअर्स मध्ये झालेली हे घसरण मोठी मनाली जातीये. २०२२ मध्ये सर्वात मोठा IPO म्हणून गाजावाजा झालेल्या LIC च्या शेर मध्ये ४० % ची घसरण पहायला मिळते आहे. LIC च्या बाजारमूल्यात जवळ पास २.५ लाख कोटीची कमी आली आहे. LIC सारख्या कंपनीला मुंबई स्टॅक एक्सचेंज मध्ये व निफ्टी मधेही पहिल्या १५ मध्ये सुद्धा स्थान मिळालेले नाही.
LIC मधील म्युचल फंडाची गुंतवणूकही कमी झालेली आहे. म्युचल फंड हे नेहमी सुरक्षित व भरवशाच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करीत असतात. नव्याने पुढे आलेल्या माहिती नुसार LIC मधील विविध म्युचल फंडाची गुंतवणुकीच्या वाटा हा ०.६६ % वरून ०.६३ % वर आला आहे.
विदेशी संस्था (FII) हि गुंतवणूक करीत असतात. या संस्थांची LIC मधील गुंतवणूक सुद्धा मधील तिमाहीत ०.१७ वरून ०.८ वर आली आहे.
सर्वमान्यांना LIC च्या या नव्या धोरणामुळे जास्तीचा फायदा मिळेल असे सांगितले जात होते.
याच अपेक्षेने सुरवातीच्या काळात सर्वसामान्य लोकांनी व लहान संस्थांनी कि ज्यांची गुंतवणूक हि २ लाखापेक्षा कमी असते, अशा शेअर्स धारकांची संख्या ४० लाख होती मात्र मागील आर्थिकवर्षाच्या अखेरीस हि कमी होऊन साधारणपणे ३४ लाख उरली आहे. यामुळे LIC मधील गुंतवणूकवरील भरवसा कमी कमी होत चालला आहे का असा प्रश्न निर्माण होतो.

See also  ज्येष्ठ लेखक, संशोधक,पुरोगामी विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांना कर्मभूमी हडपसर मध्ये श्रद्धांजली..