भाजपा आयोजित बालेवाडी येथे रक्तदान शिबिरामध्ये १२७६ रक्तदान

बालेवाडी : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोथरूड उत्तर विधानसभा मतदारसंघ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 1276 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, शिवम सुतार, शरद भोते, सुभाष भोळ, मोरेश्वर बालवडकर, प्रवीण आमले, रोनक गोटे आदी उपस्थित होते.

यावेळी बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी परिसरातील नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून कर्तव्य बजावले.

See also  रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा