प्रभाग क्रमांक १४ मध्ये महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा पाहणी दौरा

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांनी प्रभाग क्रमांक १४ मध्ये विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात कोरेगाव पार्क येथील कचरा रॅम्प, भैरोबा पंपिंग स्टेशन व स्मशानभूमी परिसर, हॉटेल वेस्टीन परिसर, कोपा मॉल रोड तसेच मुंढवा–हडपसर रेल्वे स्टेशन रोड येथील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या वेळी आयुक्तांनी संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता, कामांची प्रगती व वेळेत पूर्तता याबाबत समाधानकारक अंमलबजावणी होत आहे का, याची तपासणी केली. नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेषतः ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांबाबत सखोल चर्चा करत कामांची गती वाढवून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात मा. नवनिर्वाचित सभासदांसह शहर अभियंता मा. श्री. अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. अविनाश संकपाळ, उपायुक्त (परिमंडळ क्र. १) श्री. माधव जगताप, उपायुक्त (परिमंडळ क्र. ४) श्री. अरविंद माळी, उपायुक्त श्री. सोमनाथ बनकर, उपायुक्त श्री. रमेश शेलार, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) श्री. नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता पथ विभाग श्री. राजेश बनकर, मुख्य अभियंता विद्युत विभाग श्रीमती मनीषा शेकटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे व गुणवत्तापूर्ण मिळाव्यात यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश आयुक्त नवल किशोर राम यांनी यावेळी दिले.

See also  संरक्षण खात्याची जागा पुणे महापालिकेला हस्तांतरित - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश