बाणेर मध्ये एकावर गोळीबार, आरोपीने स्वतःला गोळीबारून केली आत्महत्या .

बाणेर : बाणेर येथे जुपिटर हॉस्पिटल जवळील दुर्गा कॅफेजवळ बंदुकीने गोळीबार केल्याने एक तरुण जखमी झाला असून गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.

बाणेर येथे राहणारा आकाश जाधव या तरुणावर त्याच्या परिचित असलेल्या अनित ढमाले याने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बाणेर जुपिटर हॉस्पिटल जवळील दुर्गा कॅफे येथे बंदुकीने गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आकाश जाधव याला जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यानंतर आरोपीने पळ काढून औंध येथे स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चतुर्श्रुंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

See also  पुण्यातील कात्रजमध्ये गोवा बनावटी मद्याची वाहतुक करतांना लग्झरी बससह विदेशी मद्यसाठा जप्त.