शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला

पुणे दि.२२: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदाचा कार्यभार महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत  श्री.आढळराव पाटील यांनी आज पदभार स्वीकारला.  

म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, म्हाडा वसाहतींमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचे कार्य नवनिर्वाचित अध्यक्षांद्वारे केलं जाईल याचा विश्वास आहे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
——

See also  पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानाचा शुभारंभ