पाषाण सुसखिंड येथील तीव्र उताराच्या रस्त्यावरील सांडलेली खडी सफाई करण्याची महेश सुतार यांची मागणी

पाषाण : पाषाण सुसखिंड येथील उताराच्या रस्त्यावर गेले अनेक आठवडे रस्त्यावर खडी पडलेली आहे. यामुळे वाहने घसरत असून नागरिकांना व वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सुतारवाडी पाषाण परिसरात बाणेर बालेवाडी तसेच महामार्गाकडे जाण्या येण्याकरिता  तीव्र उताराचा हा एकमेव मार्ग आहे.  तीव्र चढ असल्यामुळे गाडीचा स्पीड सुद्धा जास्त असतो‌. त्याच्यामुळे बऱ्याच गाड्या घसरतात. अनेकदा रस्त्यावरील खडी उडून गाड्यांवर आढळते. तसेच खडीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ देखील उडत आहे. याचा त्रास दुचाकी वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरील खडे संपूर्ण रस्त्यावर पसरली असल्याने गाड्या घसरून पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच सर्विस रस्त्यावर देखील काही प्रमाणात खडी असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जात नाही. रस्त्यावरील खडी साफ करण्यात यावी तसेच या परिसरातील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सुतार यांनी केले आहे.

See also  भीमनगरच्या रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन न्याय द्यावा  - ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांची  मागणी