मोदींची गॅरंटी खोटी; ती चालणार नाही भाजपाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाही – शरद पवार

मुंबई  : मोदींची गॅरंटी खोटी; ती चालणार नाही भाजपाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाही  असे शरद पवार यांनी सांगितले. शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मुंबई येथे पार पडलेल्या ‘इंडिया आघाडी’च्या  सभेत खासदार शरद पवार यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले.

शरद पवार म्हणाले, आजची देशाची अवस्था. भारताची परिस्थिती आहे, बदल आणण्याची गरज आहे. हे बदल घडवू शकते. आपण सर्व एकत्र येऊ, वेगवेगळ्या आश्वासना देऊन देशाला अडकवणाऱ्यांना दूर करण्यासाठी, ज्या दिवशी मतदान करण्याची संधी मिळेल, त्या दिवशी ही पाऊल उचलावी लागेल.

आपण पाहिले की आज देशावर राज्य करणारे लोक देशवासियांना अनेक आश्वासन दिले गेले. शेतकरी, मजूर, बेरोजगार युवक, महिला, दलित व आदिवासी यांना देण्यात आले. भाजपाने जी आश्वासने दिली त्यांनी काहीच राबवलं नाही हे पाहायला मिळाले. आणि म्हणून वचन देणाऱ्या, पूर्ण न करणाऱ्यांना काढून टाकण्यासाठी कृती करावी लागते, आणि हीच संधी आहे आम्ही लोक. पुढच्या महिन्यात कोणाला मिळणार

गेल्या काही महिन्यांपासून टीव्हीवर रोज एक खोटे ऐकले, मोदी  ची गॅरंटी.  हे सुरक्षिततेची गॅरंटी नाही. आणि म्हणून चुकीची हमी, चुकीची आश्वासन देऊन त्याने आपल्याला वेगळ्याच मार्गावर नेले. प्रयत्न केला. बरं झालं आजपासून टीव्ही वर गॅरंटी नाही निवडणूक आयोगाने थांबवण्याचा निर्णय घेतला म्हणून मी त्यांचेही आभार मानतो.

एवढच म्हणायचंय की या शहरात १९४२ साली महात्मा गांधीजींनी ‘छोडो हिंदुस्थान’ ‘छोडो सरकार’ हा नारा दिला होता. आज याच शहरात ‘छोडो भाजपा’, ‘भाजप मुक्त’ म्हणायचा ठरवायचा.

See also  सनी'ज् फूड्स आणि सोमेश्वर फाउंडेशनचा सर्वसामान्यांसाठी माफक दरात फराळ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद