माजी नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यावतीने कोथरुडमध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना  गावी जाण्यासाठी मोफत बससेवा

कोथरूड : शिवसेना गटनेते, माजी नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यावतीने कोथरुडमध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना कोकणांतील आपल्या गावी जाण्यासाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले.

श्री गणेशाची आरती व बसचे पूजन करुन,कोथरुड मधील वनाज कॉर्नर येथून रत्नागिरी, लांजा, खेड, चिपळूण, महाड,पाली* या भागांसाठी मोफत बस सोडण्यात आल्या. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कोकणवासीयांशी जिव्हाळ्याचे व आपुलकीचे नाते आहे. कोथरुडमध्ये आजपर्यंत असा उपक्रम कोणीही राबविला नव्हता, कोथरुड मध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यातर्फे घेण्यात आला. या उपक्रमास कोकणवासीय बंधु-भगिनिंनी भरघोस प्रतिसाद दिला.

कोकणवासीयांना दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गावी जाताना अनेक अडचणी येतात, तरी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करावे, असे कोकणवासियांनी सांगितले व या उपक्रमासाठी माझे व शिवसेनेचे आभार मानले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र मैड, शिवसेनेचे विभागप्रमुख भारत सुतार, उद्योजक विनायक मारणे, कोकणवासी महासंघाचे, श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ( ट्रस्ट )चे पदाधिकारी व सह्याद्री कुणबी संघटनेचे विराज डाखवे, सुधीर वरघडे, अनिल भगत, नचिकेत घुमटकर, योगेश चौधरी, जितेंद्र खुंटे,अभिजित चव्हाण,अजय डहाळे,विशाल उभे, मनोज अल्हाट, तुषार दुधाने, नवनाथ बाणेकर, निलेश मिस्त्री, भूषण माथवड,गजानन हिंगे,योगेश क्षीरसागर उपस्थित होते.

See also  बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा- डॉ. सुहास दिवसे