पुण्यातील महिलांच्या सुरक्षेकरता गुलाबो गँग पायल तिवारी फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : राज्यात सध्या इव्हेंट करणारी गुलाबी गँग फिरत असुन पायल तिवारी फांऊडेशनच्या माध्यमातुन मात्र पुण्यातील महिलांच्या सुरक्षेकरता गुलाबो गँग आता उतरत असुन हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले .यावेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनीही या उपक्रमाचे कौतुक केेले.आणि या प्रदर्शनाला पुणेकरांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

पायल तिवारी बिटीया फांऊडेशच्या वतीने गणोशोत्सवाच्या पाश्वभुमीवर गेल्या चौदा वर्षापासुन गौरी-गणपती जत्रेचे आयोजन करण्यात येते याहीवर्षी ही याचे आयोजन काँग्रेस भवन ,शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. या विशेष प्रदर्शनाचे उद्धाटन राज्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्यांनी बचतगटांच्या विविध उपक्रमाची माहिती घेतली.


राज्यात सध्या महिलांवर अत्याचार वाढले असुन कायद्या सुव्यवस्था बिघडली आहे. हे या सरकारचे अपयश असुन अशा घटनेच्या पार्श्वभुमीवर या जत्रेच्या निमित्ताने पायल तिवारी बिटिया फांऊडेशनच्यावतीने महिलांवर होणा-या अत्याचाराविषयी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात ही कौतुकाची बाब असुन त्यांनी जी गुलाबो गँग सुरु केली आहे. यातुन पुण्यातील महिलांच्या अडचणीच्या काळात ही गँग मदतीस जाईल.हा एक अनोखा उपक्रम असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.या प्रदर्शनाच्या ठिकाणी पुणेकरांना वाती ते मुर्ती असे सर्व पुजेच्या वस्तु सह फराळाचे विविध पदार्थ,सौंदर्याच्या वस्तुही उपलब्ध आहेत हे प्रदर्शन दिनांक सात सप्टेंबर पर्यत शिवाजीनगर काँग्रेस भवन येथे सुरु राहणार आहे.

See also  मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण