चांदणी चौकातील उद्घाटनाच्या निमित्ताने महामार्ग लगत असलेले रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत

कोथरूड : चांदणी चौकातील पुलाचे उद्या उद्घाटन असून सगळी तयारी पूर्ण झाली मांडव बॅनर होर्डिंग्ज ने पूर्ण शहर भरले पण याच चांदणी चौकातील खड्डा मात्र भरला नाही. यामुळे चांदणी चौकाचे स्टार झळकले असले तरी खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे मात्र हाल होत असल्याची टीका शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा संघटक सचिन दगडे, अमित कुडले यांनी केली आहे.

अतिशय महत्वाचा ठिकाणीं हा मोठा खड्डा आहे दोन रस्ते या ठीकानी एकत्र येवून दोन्हीं बाजूंना येताना जाताना हे मोठे खड्डे आहेत. गेली बरेच दिवस हा खड्डा आहे कधी कधी यामुळे ट्रॅफिक देखिल जॅम होते. तरी प्रशासन जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच मुळशीकरांना सुसज्ज बसथांबा देखील अपेक्षित असा अजुन तयार झाला नाही. अनेक ठिकाणी सर्विस रस्त्यांवर मोठे खड्डे असून या रस्त्यांची देखील दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरालगत असलेल्या महामार्ग लगतच्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी.

तसेच या पुलास स्वर्गीय मामासाहेब मोहोळ हे नाव देण्यात यावे अशी मागणी मुळशीकर करत आहे अशी मागणी उपजिल्हा संघटक सचिन दगडे, तालुका संघटक अमित कुडले यांच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  समन्वय ठेऊन मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडा– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार