हिंदू संघटना आणि हिंदू धर्म हाच देशाच्या विकासाचा मार्ग आहे: श्री बाबू आगेलू

पुणे : रा. स्व. संघ विद्यापीठ भागाचा (छत्रपती शिवाजी महाराज नगर , गोखले नगर, विद्यापीठ नगर आणि बोपोडी – खडकी नगर ), विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव गाडी मैदान खडकी येथे संपन्न झाला.

विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री बाबू आगेलु तर प्रमुख वक्ते श्री. श्रीनिवास मंगेश पुलेया (प्रांत धर्मजागरण प्रमुख रा. स्व. संघ. प. महाराष्ट्र प्रांत) उपस्थित होते. कार्यक्रमाला श्री. सुरेश नाईकरे (बोपोडी नगर संघचालक ), श्री. अविनाश वाचसुंदर (छ. शिवाजी महाराज नगर संघचालक ) आणि श्री.अनिल देशमुख (गोखलेनगर संघचालक) उपस्थित होते.

श्री बाबू आगेल्लू ह्यांनी आपल्या भाषणात संघाच्या शताब्दीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हे काम प्रेरणादायी आहे. हिंदू संघटना आणि आपला धर्म हाच देशाच्या विकासाचा मार्ग आहे. आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा देण्याचे काम आपले आहे. येणाऱ्या काळात हिंदुत्वाचे कार्य वाढावे यासाठी सर्वांनी हे राष्ट्र आपले आहे या भावनेने एकत्र येऊन काम करायला हवे. हा देश पुन्हा खंडीत न होऊ देणे हे आपले काम आहे. संपूर्ण विश्वात आपल्या देशाची वाहवा होत आहे. कुटुंबात जसे वेगळ्या विचाराची व्यक्ती असते तसेच देशाचे आहे. पण सर्वाँना घेऊन कोणत्याही प्रकारची निराशा येऊ न देता काम करायला हवे.

श्री. श्रीनिवास पुलैय्या ह्यांनी आपल्या भाषणात धारणा इती धर्म: ही धर्माची व्याख्या आहे. अधर्मावर धर्माने विजय मिळवलेला दिवस असे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. राम आणि रावण हे दोघेही हिंदू असूनही, राम हा नैतिकतेच्या बाजूने होता. म्हणून त्याच्या विजयाचे महत्त्व. राम हा सर्वत्र देव म्हणून आता विश्वात वंदनीय गणला जातो. जगभर हिंदू धर्माचे आकर्षण वाढत आहे. पांडवांनी पण याच दिवशी शमीच्या वृक्षावरून शस्त्रे काढली तोच हा दिवस. आपण जो व्यवसाय करतो, त्या व्यवसायासाठी लागणारी आयुधे यांचेही पूजन आपण याच दिवशी करतो. शिवाजी महाराज देखील याच सुमारास मोहिमेसाठी निघायचे. निसर्गाचे, व्यक्तीचे आणि विचाराचे परिवर्तन हे विजयादशमीच्या सीमोल्लंघनाचे वैशिष्ट्य. दसऱ्याला सुरू झालेले हे संघाचे काम संघाचे कोणतेही तुकडे न होता अखंड चालू आहे.

स्वयंसेवकांनी विविध मैदानी कलेचे प्रात्यक्षिके साजरी केलीत. उत्सवात स्वयंसेवकांनी सांघिक गीत सादर केले. ह्या कार्यक्रमाला अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.

See also  भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी लवकरच देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार - केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील