भिडे पुला लगत मुठा नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

पुणे  : पुणे शहरातील डेक्कन या ठिकाणी भिडे पुलालगत नदीपात्रात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असून प्रशासन यावर मूग गिळून गप्प आहे. वाढते शहरीकरण पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे कारण ठरत असून जैवसाखळी नष्ट होत चालली आहे. अशा प्रसंगी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे अपेक्षित असताना नदीपात्रात राडारोडा टाकल्याने नदीची वहन क्षमता कमी होणार आहे. परिणामी नदीची पुरस्थिती अधिक गंभीर बनणार असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.

याबाबत पुणे मनपाचे मा. आयुक्त डॉ राजेंद्र भोसले  यांना  प्रत्यक्ष भेटून यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी व तसे न झाल्यास पुणे अर्बन सेलच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे. तसेच माननीय महापालिका आयुक्त यांनी ताबडतोब सदर आपल्या पत्रावर त्वरित कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश सुद्धा दिले आहेत.

यावेळी पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्निल दुधाने तसेच कोथरूड अर्बन सेल विधानसभा अध्यक्ष सचिन यादव उपस्थित होते.

See also  रावसाहेब दानवे भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नियुक्त झाल्यामुळे पुण्यातील निकटवर्ती माजी नगरसेवकांना विधानसभेची संधी मिळणार का?