जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मुळशी परिसरातील मतदान केंद्रांना भेट

पुणे, दि.२२: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुळशी परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे, सोबत उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, मुळशी तहसीलदार रणजित भोसले , पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.  मतदारांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पाच ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत, अशा ठिकाणी मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ.दिवसे यांनी यावेळी  कासार आंबोली येथील साहित्य वाटप व स्वीकृती केंद्राची पाहणी केली.

See also  दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा