शिवाजीनगर गावठाणात मंदिरांची स्वच्छता, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सहभाग

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजीनगर गावठाण येथील श्रीराम मंदिर आणि श्री रोकडोबा मंदिर परिसरात (रविवारी) सकाळी स्वच्छता अभियान राबवले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आवाहन केले आहे की, ५०० वर्षानंतर अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या हक्काच्या मंदिरात स्थानापन्न होणार आहेत, तरी सर्व भारतीयांनी १२ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत आपल्या परिसरातील मंदिरे स्वच्छ करावीत. त्या आवाहनानुसार छ शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शिवाजीनगर गावठाणातील श्रीराम मंदिर आणि श्री रोकडोबा मंदिर परिसरात स्वच्छता केली.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रशंसा केली आणि महाराष्ट्रात ही मोहीम कार्यकर्ते यशस्वी करतील, असा विश्वास व्यक्त केला.

See also  माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने होणार चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप