मुंबई : महायुतीच्या सरकारचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळा आझाद मैदान मुंबई येथे पार पडला, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी यावेळी गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांतील मुख्यमंत्री राजकारणातील विविध दिग्गज उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे गटाने मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकला होता, परंतु अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आणि सरकार स्थापनेसाठी सहमती दर्शवली. यामुळे महायुतीतून एकजूट दर्शवली गेली.
यावेळी राज्यातील कला, क्रिडा, उद्योग आदी विविध क्षेत्रातातील मान्यवर उपस्थित होते.