औंध परिहार चौकातील खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

औंध : औंध परिहार चौकामध्ये एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा विभागा च्या पाईपलाईन साठी मुख्य चौकात खोदकाम करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाले आहे.

परिहार चौकामध्ये सातत्याने होत असलेल्या खोदकामामुळे या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. परिहार चौकामध्ये खोदकाम करण्यात आल्याने या ठिकाणी बस अडकून पडली होती. रस्ता खचला असून खराब झाल्याने अखेर दुसऱ्या बाजूने वाहने काढण्यात आली.

गेले अनेक महिने एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे एकाच जागे हॉटेल चंद्रमा समोर अनेकदा खोदकाम करूनही हा प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. यामुळे सातत्याने होत असलेले खोदकाम व वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

औंध परिहार चौकातील रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा तसेच वाहतूक कोंडीच्या प्रश्नासाठी पर्याय व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी मनसेचे निलेश जुनवणे यांनी केली आहे.

See also  बाणेर-बालेवाडीतील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा विविध चौकांमध्ये ट्रॅफिक वॅार्डनची नियुक्ती