राज्य सहकार धोरण ठरविणाऱ्या उच्चस्तरीय समितीत अॅड. सुभाष मोहिते यांची निवड

पुणे : केंद्र शासनाच्या केंद्रीय सहकार धोरण २०२५ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सहकार धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने मा. सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून Pune Peoples Co‑op Bank Ltd. चे ज्येष्ठ संचालक व व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

अॅड. मोहिते हे पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचे माजी अध्यक्ष असून सध्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते Pune District Urban Cooperative Banks Association चे माजी अध्यक्ष व विद्यमान मानद सचिव आहेत. याशिवाय ते Pune District Cooperative Board चे संचालक तसेच Ramrajya Cooperative Bank चे संस्थापक म्हणून कार्यरत राहिले आहेत.

सहकार क्षेत्रात विशेषतः नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांनी गेली ५० वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. तसेच सहकार व कामगार न्यायालयात सुमारे ३६ वर्षे वकील म्हणून कार्यरत राहिल्यामुळे त्यांचा प्रदीर्घ अनुभव राज्याच्या सहकार धोरण निर्मितीत मोलाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, या उच्चस्तरीय समितीमध्ये प्रथमच वकील व्यवसायातील व्यक्तीचा सदस्य म्हणून समावेश झाला असून ही बाब सहकार क्षेत्रासाठी कौतुकास्पद मानली जात आहे.

See also  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ व कसबा पेठ यांच्या मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची ममहापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी