सुसगाव येथे श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण सोहळा आयोजन

सुस : श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिना निमीत्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने ब्रम्हांडनायक मठाचा सामुहिक श्री स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गुरूवर्य प्रसाद दादा तामदार  उपस्थित राहणार आहेत.


पारायण करण्यासाठी इच्छुक स्वामी भक्तांनी  उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने आयोजक रणजीत बहिरट यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन  सुसगाव, तापकीर वस्ती, शेल पेट्रोलपंपा समोर रविवारी सायंकाळी चार ते सात दरम्यान करण्यात आले आहे.

See also  पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात 125 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत दिली माहिती