मराठा समाजाच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी.. महविकास आघाडीचा धरणे आंदोलन.

पुणे : अंतरावली सराटी, जालना या ठिकाणी मराठा समाजाच्या शांतीपूर्वक चाललेल्या आंदोलनावर राज्य सरकारकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये अनेक निरागस नागरिक जखमी झाले असून हा फक्त आंदोलनकर्त्यांवर नाही तर प्रत्यक्ष लोकशाहीवर झालेला हल्ला होता.

गेल्या कित्येक वर्षांपासून लाखोंच्या संख्येने निघणारे मराठा मोर्चे जगाला आदर्श घालून देणारे आणि नवा आदर्श स्थापित करणारे आहेत. जालना जिल्ह्यातील आंदोलनही शांतीपूर्वक आणि लोकशाहीचा आदर राखत सुरू असताना झालेला हल्ला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला काळिमा फासणारा होता.

सरकारचे लोकशाहीविरोशी धोरण आणि आबालवृद्धांवर करण्यात आलेला हा हल्ला स्वातंत्र्यपूर्व काळातील जालियनवाला बाग हल्ल्याची आठवण करून देणारा होता, ज्याला विरोध करणे हे जागरूक नागरिक या नात्याने आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.

याच अनुषंगाने या घटनेचा निषेध करण्यासाठी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी असून भविष्यात असा कोणताही लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम सरकारला देण्यात आला.

या वेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे,अरविंद शिंदे,चंद्रकांत मोकाटे,अभय छाजेड,गजानन थरकुडे,पृथ्वीराज सुतार ,स्वप्नील दुधाने,गिरीश गुरनानी,योगेश मोकाटे ,राम थरकुडे,संगीता तिवारी, मृनाली वाणी,आदी महाविकास आघाडी पदाधिकारी नेते उपस्थित होते.

See also  आता गणपती बाप्पा पण करणार मतदान; महाळुंगे मध्ये सूर्यमुखी गणेश मंदिराचे मतदार यादीत नाव