“अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला महिलांच्या ताब्यात द्या, त्या त्याचा योग्य समाचार घेतील.. खासदार मेधा कुलकर्णीं आक्रमक

पौड : अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला महिलांच्या ताब्यात द्या, त्या त्याचा योग्य समाचार घेतील. भगवान शिवशंकराकडे प्रार्थना करते की आई अन्नपूर्णा मातेच्या संदर्भात विकृत कृत्य करणाऱ्या विकृतीला समूळ उखडून टाकण्यासाठी शक्ति द्यावी असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

पौड गावातील श्री नागेश्वर महादेव मंदिरात अन्नपूर्णा देवीशच्या मूर्ती सोबत विकृत कृत्य करून मूर्तीची विटंबना करणाऱ्या जिहादी वृत्ती विरोधात मुळशी तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित निषेध मोर्चा काढण्यात आला.

श्री नागेश्वर देवस्थानाच्या जिर्णोद्धारासाठी  खासदार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी ग्रामस्थांना दिले.

या प्रसंगी भाजप आमदार मा.श्री. गोपीचंद पडळकर जी, भोर – राजगड – मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. शंकर मांडेकर जी, माजी आमदार मा.श्री. संग्राम थोपटे जी, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, शीतलदादा शिंदे व मुळशी तालुक्यातील धर्माभिमानी हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

See also  यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी रोड, धनकवडी येथे मोफत श्रवणयंत्र तपासणी व चष्मे वाटप