पुणे – संदीप खर्डेकर (भाजपा प्रवक्ते ), “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते सैरभैर झाले होते.मतदारांच्या डोळ्यापुढे रहावे म्हणून होऊ द्या खर्च सुरु होतं.त्याच बरोबर महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासक राज होता, अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत होते,त्यांच्यावर कोणाचाच वचक नव्हता,त्यामुळे शहराच्या विकासावर मोठा परिणाम झालाय.निर्वाचित लोकप्रतिनिधी हे नागरिकांशी थेट संपर्कात असतात आणि त्यामुळे दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी त्यांचा रोल महत्वाचाच असतो.
सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता चार महिन्यात सम्पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अवघड वाटते. शेजारी शत्रू राष्ट्रासोबत तणावाच्या स्थितीत काहीही घडू शकते आणि प्रशासनापुढे अन्य महत्वाचे कार्य येऊ शकते.आणि पावसाळ्यात निवडणुका घेणे अडचणीचे होईल, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत पाऊस लांबतो.