रस्त्यांवर खड्ड्यात वृक्षारोपण ‘राष्ट्रवादी’च्या इशाऱ्यामुळे पालिकेकडून तत्पर काम सुरू

औंध ता. १(प्रतिनिधि) : औंध बोपोडी भागात रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे लोकाना त्रास होत होता. याबाबत औंध बोपोडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांना निवेदन देऊनही खड्डे भरण्याचे काम सुरू झाले नव्हते. म्हणून खड्यात वृक्षारोपण करणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी घेतली होती.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खडकी पोलिस तसेच सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी आश्वासन देऊन खड्डे भरण्यास सुरुवात केली. काल रात्रीत ऐंशी टक्के काम पूर्ण करत आणले असून येत्या चार- पाच दिवसांत उर्वरित काम पूर्ण केले जाईल असे दापकेकर यांनी सांगितले. महापालिकेकडून झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे माने यांनी सांगितले.

यावेळी शशिकांत कांबळे, अनिल माने, प्रतिक वाघमारे,  हर्षल कांबळे आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना सुनील माने म्हणाले, पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर रस्त्यात खड्डे पडले होते.  पावसाळयापूर्वी हे खड्डे भरून घ्यावे, चेंबर साफ करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतरही २६ जून रोजी पुन्हा वाहनधारकाना होणारा त्रास लक्षात घेता क्षेत्रीय कार्यालयाला खड्डे बुजवणे बाबत पत्र दिले. यानंतर ही काम सुरू झाले नसल्यामुळे आम्ही प्रत्येक खड्यात झाड लावणार असल्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाला कळवले होते. या आंदोलनाला औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांनाही वृक्षारोपणासाठी आम्ही आमंत्रीत केले होते. मात्र श्री. दापकेकर यांनी माझ्याशी संपर्क साधत खड्डे बुजवण्याचे काम सुरू करत असल्याचे कळवले. त्याचप्रमाणे पोलिसांनी ही आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली. आज सकाळी कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, मुकादम सिद्राम घोगरे यांच्यासह खड्डे बुजवलेल्या ठिकाणी भेट देऊन उर्वरित खड्डे भरण्यास सांगितले. तसेच चार ठिकाणी ड्रेनेजचे काम करण्यास सांगितले. याबाबत उपअभियंता दिलीप काळे, कार्यकरी अभियंता रमेश वाघमारे यांनी ही मला दूरध्वनीवरून संपर्क साधत लवकरात लवकर खड्डे बुजवण्याबाबत अश्वस्थ केल्यानंतर आम्ही आजचे आंदोलन स्थगित केले असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.

See also  रात्रीच्या वेळी चालणारी बांधकामेबंद करावी - आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी