मैत्री युवा प्रतिष्ठान,पुणे यांच्याकडून शालेय साहित्य वाटप

पुणे : पुण्यातील सामाजिक संस्था मैत्री युवा प्रतिष्ठान यांच्याकडून १५ ऑगस्ट,२०२५ स्वातंत्र्यदिनी मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण केंद्र आंबवणे आणि भांबुर्डे या अंतर्गत दुर्गम भागातील शाळांमधील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

सदर उपक्रमास सर्व केंद्रातील शालेय शिक्षक कर्मचारी व सेवक वर्गाच्या सोबत मैत्री युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

मैत्री युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भोसले, मनोज बाठे, मिलिंद आहेर, शंकर गायकवाड, विजय बेडसे , सागर गायकवाड , किरण वाल्हेकर आणि सर्व सभासद यांच्या सहकार्यातून कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन