पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रस्तावित प्रारुप प्रभागरचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या प्रभागरचनेनुसार महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार आहेत. त्यातील 40 प्रभागांतून चार नगरसेवक तर एका प्रभागातून पाच असे एकूण 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. आंबेगाव कात्रज हा प्रभाग पाच नगरसेवकांचा राहणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2011 च्या जनगणनेनुसार पुणे शहराची 34 लाख 81 हजार 359 लोकसंख्या गृहीत धरत ही प्रभारगरचना करण्यात आली आहे. त्यानुसार आंबेगाव- कात्रज हा सर्वाधिक मोठा (114970) आणि अप्पर सुपर इंदिरानगर हा सर्वात लहान (75944 लोकसंख्या) प्रभाग ठरला आहे. जाहीर केलेल्या प्रभागरचनेनुसार कळस- धानोरी हा प्रभाग क्रमांक एक ठरला असून महंमदवाडी- उंड्री प्रभाग 41 असणार आहे.
